ही पुस्तकं मिळत नसतील तर कुठून तरी अलगद ढापायलाही हरकत नाही. अशा ग्रंथांची चोरी म्हणजे महापुण्यच
हेतू होता प्रा. एकनाथ साखळकर यांनी प्रकाशित केलेल्या ‘आठवणीतल्या कविता’ या तीन भागांतील कवितासंग्रहांची भरभरून स्तुती करण्याचा. तेवढी जागा आता उरली नाही. या संग्रहांचे संपादक आहेत पद्माकर महाजन, दिनकर बरवे, रमेश तेंडुलकर, राम पटवर्धन. ही तीन पुस्तकं घरात कुठेही विखरून ठेवावीत म्हणजे मौजच मौज. येता-जाता मेजवानी. आपण बिनदिक्कत हा खजिना लुटत राहावा, यासारखी दुसरी कोणती सुसंस्कृत आणि मधुर लुटालुट नसेल.......